सोलापूर – देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विविध योजनेते लाभार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमा साठी सातशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करणेत आली होती. लाभार्थ्यांच्या रांगेत बसून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी लाभार्थ्यांचे रांगेत बसून भोजन केले. प्रशासनाच्या संवेदनशिलतीने ग्रामस्थ व उपस्थित लाभार्थी भारावून गेले.
हुतात्मा सभागृहात आज सिमला येथून थेट प्रक्षेपणात सातशे लाभार्थी व अधिकारी यांचेशी संवाद कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपले नंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी हे बाहेर आले. मार्गातील लाभार्थ्यांची आदबीने विचारपूस करत असताना परत माघारी येऊन त्यांना भोजनाचा मंडप गाठला. उपस्थित भोजन करीत असलेले लाभार्थी यांना भोजनाची विचारपूस करत असताना सिईओ दिलीप स्वामी यांनी आम्हाला लाभार्थ्यांसमेवत जेवण द्या. असे म्हणत जिल्हाधिकारी लाभार्थ्यांसाठी ठेवलेले टेबल व प्लास्टीक खुर्च्या च्या भोजन रांगेत बसले. लाभार्थ्यांसाठी आणलेले पॅकींग मधील भोजनाचा आस्वाद घेतला. गरम गरम चपाती, बेसन, मटकीची सुक्की भाजी व गुलाब जामुन आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी व सिईओ यांनी लाभार्थ्यां समवेत भोजन घेतले नंतर उपस्थित लाभार्थी भारावून गेले.
कार्यक्रम संपले नंतर वरिष्ठ अधिकारी निघून जातात याचा अनुभव आहे. मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी तसे न करता लाभार्थ्यांसमवेत भोजन करून त्यांना आनंद दिला. त्यांचे सुखात सहभागी झाले. शासकीय योजनेमुळे जिवनात आनंद मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे संवेदनशिलतेचा अनुभव आला. अनेक लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी व सिईओ यांचे समवेत फोटो घेतले. उप जिल्हाधिकारी शमा पवार यांनी सकाळी ९ वाजले पासून कार्यक्रमाची तयारी करणेत व्यस्त होते. प्रत्येक लाभार्थ्यांचे आदबीने स्वागत करून विचारपूस करीत होते. प्रशासनातील अधिकारी यांचे प्रेमाने दूरवरून आलेले ग्रामस्थ भारावून गेले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथील कार्यक्रमाकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव,कार्यकारी अभियंता दीपक कोळी, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके, तहसीलदार प्रशासन श्रीमती कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपस्थित होते.
लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
……………………
हुतात्मा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे काॅन्फरन्सीग द्वारे मार्गदर्शन झालेनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधलेले लाभार्थ्यांना तसेच सांडपाणी व्यवस्थापन साठी शौषखड्डे बांधलेल्या वडाळा येथील लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करणेत आले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विषयावरील माहिती पत्रकाचे प्रकाशन करणेत आले.
प्रशासनातील एकजुटीने कार्यक्रमात रंगत
……….
सर्व केंद्र शासनाचे योजनेतील लाभार्थ्यांना आज समारंभा साठी निमंत्रित करणेत आले होते. लाभार्थ्यांना यांना ने आण करणे पासून रांगेत बसविणेसाठी चोख व्यवस्था करणेत आली होती. एनआयसीचे अधिकारी यांनी थेट प्रक्षेपना साठी खास सुविधा केली होती.