Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : नातवाने आजीचा केला स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून ; खुनाचा गुन्हा 5 तासात उघडकीस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सकाळी एका महीलेचा मृतदेह आढळला होता. सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 5 तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. 

आपल्या पत्नीला शिवीगाळ करून वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नातवाने आपल्या आजीचा घराचे कौलरने मारुन आणि स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

जिल्हा परिषद सोलापूर येथील आवक-जावक कार्यालयाच्या बाजूस एक महिला बेशुध्द अवस्थेत पडली आहे. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे सदर ठिकाणी पोहोचले असता, तेथे असलेल्या एक पडक्या खोलीत एक महिला काहीही हालचाल न करता जमीनीवर पडलेली दिसली. 

सदर महिलेच शरीर फुगलेले होते व संपूर्ण बॉडी कुजलेली होती. त्याचवेळी सदर ठिकाणी नमूद महिलेची मुलगी शबाना शेख ही आली व तिने सदरची महिला तिची आई असून तिचे नाव रजिया सलीम शेख वय ७२ वर्षे रा.७३४/२ जीपीएम, विडी घरकूल, कुंभारी सोलापूर असे असल्याचे सांगितले व सदर महिला रोजी सकाळी ०७.०० पासून बेपत्ता असून याच ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर दि. २५/०६/२०२२ येथील सेतू कार्यालयात कमिशन एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले.

सदरचा प्रकार सकृतदर्शनी खूनाचा दिसून आल्याने पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणे पोलीसांसमोर आव्हान होते. त्या अनुषंगाने  डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / दिशा) सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीकोनातून मार्गदर्शन करून आरोपीच्या शोधार्थ रवाना केले.

गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेकडील सपोनि क्षीरसागर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या बातमीनुसार एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. सदर संशयिताकडे डॉ. प्रिती टिपरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे),  माधव रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-२), वपोनि  सुनिल दोरगे, गुन्हे शाखा, वपोनि श्रीमती भोसले, सदर बझार पोलीस ठाणे, गुन्हे शाखेकडील सपोनि क्षिरसागर व त्यांचे पथकातील अंमलदार पोना/महेश शिंदे, पोना/ तात्यासाहेब पाटील, पोशि/राजू मुदगल, पोशि/कुमार शेळके यांनी अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सांगितले की,

 “मयत महिला नाम रजिया शेख ही त्याची आजी असून ती सतत त्याचे पत्नीस शिवीगाळ करत होती व तिचे चारित्र्य चांगले नसलेबाबत वारंवार लोकांना सांगत होती व तिचेशी वरिवार भांडण करून नाहक त्रास देत होती. म्हणून मी चिडून जावून तिचा जिल्हा परिषद येथील पडक्या खोलीत घराचे कौलाने व स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केला आहे.” असे सांगून त्याचे नाव शाहनवाज महेबूब शेख वय-२२ वर्ष रा.६२३ बी. नवीन घरकूल, कुंभारी सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर सपोनि क्षिरसागर यांनी त्यास पुढील तपासकामी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांचे ताब्यात दिले असून पुढील तपास सदर बजार पोलीस ठाण्याच्या वपोनि अश्विनी भोसले हया करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सुरेश हसापुरे म्हणाले ; म्हेत्रेंच्या शब्दाला मान अन् सुत मिलच्या कामगार……. निवडणूक बिनविरोध

Next Post

पृथ्वीराज माने यांच्या शाल, हार नको…वह्या द्या आवाहनास प्रंचड प्रतिसाद ; शुभेच्छा देण्यासाठी सुमित्रा निवासात कार्यकर्त्याची गर्दी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पृथ्वीराज माने यांच्या शाल, हार नको…वह्या द्या आवाहनास प्रंचड प्रतिसाद ; शुभेच्छा देण्यासाठी सुमित्रा निवासात कार्यकर्त्याची गर्दी

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985920
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group