सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सकाळी एका महीलेचा मृतदेह आढळला होता. सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 5 तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.
आपल्या पत्नीला शिवीगाळ करून वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नातवाने आपल्या आजीचा घराचे कौलरने मारुन आणि स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
जिल्हा परिषद सोलापूर येथील आवक-जावक कार्यालयाच्या बाजूस एक महिला बेशुध्द अवस्थेत पडली आहे. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे सदर ठिकाणी पोहोचले असता, तेथे असलेल्या एक पडक्या खोलीत एक महिला काहीही हालचाल न करता जमीनीवर पडलेली दिसली.
सदर महिलेच शरीर फुगलेले होते व संपूर्ण बॉडी कुजलेली होती. त्याचवेळी सदर ठिकाणी नमूद महिलेची मुलगी शबाना शेख ही आली व तिने सदरची महिला तिची आई असून तिचे नाव रजिया सलीम शेख वय ७२ वर्षे रा.७३४/२ जीपीएम, विडी घरकूल, कुंभारी सोलापूर असे असल्याचे सांगितले व सदर महिला रोजी सकाळी ०७.०० पासून बेपत्ता असून याच ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर दि. २५/०६/२०२२ येथील सेतू कार्यालयात कमिशन एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले.
सदरचा प्रकार सकृतदर्शनी खूनाचा दिसून आल्याने पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणे पोलीसांसमोर आव्हान होते. त्या अनुषंगाने डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / दिशा) सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीकोनातून मार्गदर्शन करून आरोपीच्या शोधार्थ रवाना केले.
गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेकडील सपोनि क्षीरसागर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या बातमीनुसार एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. सदर संशयिताकडे डॉ. प्रिती टिपरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), माधव रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-२), वपोनि सुनिल दोरगे, गुन्हे शाखा, वपोनि श्रीमती भोसले, सदर बझार पोलीस ठाणे, गुन्हे शाखेकडील सपोनि क्षिरसागर व त्यांचे पथकातील अंमलदार पोना/महेश शिंदे, पोना/ तात्यासाहेब पाटील, पोशि/राजू मुदगल, पोशि/कुमार शेळके यांनी अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सांगितले की,
“मयत महिला नाम रजिया शेख ही त्याची आजी असून ती सतत त्याचे पत्नीस शिवीगाळ करत होती व तिचे चारित्र्य चांगले नसलेबाबत वारंवार लोकांना सांगत होती व तिचेशी वरिवार भांडण करून नाहक त्रास देत होती. म्हणून मी चिडून जावून तिचा जिल्हा परिषद येथील पडक्या खोलीत घराचे कौलाने व स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केला आहे.” असे सांगून त्याचे नाव शाहनवाज महेबूब शेख वय-२२ वर्ष रा.६२३ बी. नवीन घरकूल, कुंभारी सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर सपोनि क्षिरसागर यांनी त्यास पुढील तपासकामी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांचे ताब्यात दिले असून पुढील तपास सदर बजार पोलीस ठाण्याच्या वपोनि अश्विनी भोसले हया करीत आहेत.
















