Friday, October 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 October 2026
in solapur
0
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

oplus_2

0
SHARES
259
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत बार्शी, मंगळवेढा आणि मोहोळ हे तालुके जवळजवळ बिनविरोध झाल्यात जमा आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार आमदारांसह दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 1 खासदार, 6 आमदार, 9 माजी आमदार आणि एका माजी महापौरांसह तब्बल 196 उमेदवारांनी 238 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्याकडे दाखल केले आहेत. यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, अभिजित पाटील, बाबासाहेब देशमुख हे सहा आमदार, राजन पाटील, जयवंतवराव जगताप, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, दिलीप माने, शामल बागल, राम सातपुते, सिध्दाराम म्हेत्रे हे 9 माजी आमदार तसेच माजी महापौर शोभा बनशेट्टी, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा परिषदेच्या सभागृहनेत्या रश्मी बागल, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सदस्य अतुल पवार, माढ्याच्या नगराध्यक्षा अ‍ॅड.मिनल साठे, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा, भारती शिवदारे, सुरेश हसापुरे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या पत्नी पूर्वा वाघमारे आदींचा समावेश आहे.

दाखल अर्जांची छाननी सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 पासून जिल्हा बँकेच्या सभागृहात करण्यात येणार आहे. छाननीनंतर मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, बार्शी तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार राजेंद्र राऊत व त्यांचे पुत्र रणवीर राऊत या दोघांचेच अर्ज आल्याने हा मतदारसंघ बिनविरोध झाल्यात जमा आहे. यापाठोपाठ मोहोळा तालुका सोसायटी मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील व त्यांचे पुत्र विक्रांत पाटील या दोघांचेच अर्ज आहेत तसेच मंगळवेढा तालुका सोसायटी मतदारसंघात माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्याच कुटुंबातील उमेदवार आहेत. त्यामुळे मोहोळ व मंगळवेढा सोसायटी मतदारसंघही बिनविरोध झाल्यातच जमा आहे.

दुसरीकडे अर्ज दाखल केलेल्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात बैठका, तडजोडी आणि मनधरणी होणार आहे. प्रत्यक्ष अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदार संघनिहाय उमेदवार
बँकेस संलग्न असलेल्या शेतकी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषक सेवा सोसायट्या यांच्यावतीने तालुका प्रतिनिधी: जागा: 11 उमेदवार: 47
अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी, विश्वेश्वर नागूर, संजीव पाटील
बार्शी : राजेंद्र राऊत, रणवीर राऊत
करमाळा : जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, सुभाष गुळवे.
माळशिरस : सुभाष निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शहाजीराव देशमुख, संग्रामसिंह जहागीरदार, ज्ञानराज पाटील.
माढा : रणजित शिंदे, संजयमामा शिंदे, यशंवत शिंदे, गणपतराव साठे, भारत शिंदे, संजय कोकाटे,
मंगळवेढा : सुशील आवताडे, सिध्देश्वर आवताडे, बबन आवताडे.
मोहोळ : राजन पाटील, विक्रांत पाटील.
पंढरपूर : कल्याण काळे, प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, प्रणव परिचारक.
सांगोला : पोपट गडदे, रुपाली लवटे, सुभाष पाटील, मारुती ढाळे, गजेंद्र कोळेकर, बाबासाहेब देशमुख, चेतनसिंह केदार-सावंत, विलास पाटील, सिध्देश्वर मेटकरी, संजय इंगोले, अतुल पवार.
उत्तर सोलापूर : दिलीप माने, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, बाबासाहेब पाटील.
दक्षिण सोलापूर : श्रीदीप हसापुरे, भारती शिवदारे, सुरेश हसापुरे.
महिला मतदारसंघ: जागा: 2 उमेदवार: 33
राधा सुरवसे, अस्मिता गायकवाड, मंदाकिनी गडदे, सृष्टी टिक्के, निलाबाई काटकर, सविता गायकवाड, सिंधू पाटील, रोहिणी तडवळकर, शोभा बनशेट्टी, इंदुमती अलगोंडा, रुपाली लवटे, निता गुंड, प्रियांका भगत, आशा घावटे, रुपमती साळुंखे, शामल बागल, रश्मी बागल, वनिता गुळवे, अश्विनी बागल, वनिता लवटे, राणी वारे, पूजा चौगुले, सुवर्णा दळवे, नंदाबाई केवारे, रुक्मिणी रणदिवे, वैशाली चौगुले (माने), अर्चना घाडगे, मिनल साठे, विणा जोकारे, सुनीता खुने, मायादेवी नारनवरे, त्रिवेणी आफळे, सविता खडतरे.
अनुसूचित जाती/जमाती: जागा: 1 उमेदवार: 14
बिराप्पा इंगळे, सत्यवान कांबळे, शंकर गायकवाड, विष्णू वाघमारे, जयंत साळे, अरविंद भोसले, महादेव साबळे, नानासाहेब नाईकनवरे, किसन सातपुते, पूर्वा वाघमारे, वेदा दुपारगुडे, राम सातपुते, दत्तात्रय खडतरे, कविता खडतरे.
इतर मागासवर्गीय : जागा: 1 उमेदवार: 18
भीमराव येडवे, अजिंक्यराणा पाटील, नागनाथ कदम, सिध्दाराम म्हेत्रे, जमीर सुतार, बसवराज पाटील, शोभा बनशेट्टी, सुरेश हसापुरे, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, जयकुमार माने, चिदानंद स्वामी, नागनाथ शिंदे, विशाल केवारे, यशवंत शिंदे, सिध्देश्वर आवताडे, लतीफ तांबोळी, शाम आकळे.
भटक्या विमुक्त जाती/जमाती : जागा: 1 उमेदवार: 23
हनुमंत मासाळ, युवराज राठोड, पोपट गडदे, राहुल घुटुकडे, विलास लेंगरे, संजय राठोड, प्रताप टेकाळे, रुपाली लवटे, प्रथमेश पाटील, अनिकेत देशमुख, शिवाजी कांबळे, मारुती लवटे, राहुल वाघमोडे, गिरमल कोळी, राजेंद्र बंदीछोडे, श्रीधर कोडले, तानाजी वाघमोडे, रमेश वाकसे, विलास पाटील, ज्ञानराज पाटील, महेंद्र खटके, प्रमोद राठोड, हनुमंत सूळ,
कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्था : जागा: 1 उमेदवार: 16
सुशील आवताडे, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे, बाबूराव गायकवाड, सूर्यादित्य साळुंखे, रमेश जाधव पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विजय ताटे, धैर्यशील मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, यशवंत शिंदे, समाधान आवताडे, अभिजित पाटील.
इतर शेती संस्था : (दुग्ध संस्था/व्यक्ती सभासद) : जागा: 1 उमेदवार: 13
रणजित शिंदे, मल्हारी गायकवाड, सूर्योदित्य साळुंखे, रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, मारुती लवटे, वनिता लवटे, पूजा चौगुले, शिवाजी पाटील, बाळासाहेब माळी, अभिजित घाडगे, समाधान आवताडे.
नागरी बँका, पतसंस्था, कंझुमर्स, पाणीपुरवठा व औद्योगिक संस्था प्रतिनिधी : जागा: 1 उमेदवार: 32
सिध्देश्वर आवताडे, अजिंक्यराणा पाटील, मनीष देशमुख, सुभाष देशमुख, प्रकाश पाटील, अस्मिता गायकवाड, कल्याण काळे, भीमाशंकर जमादार, सिध्दाराम चाकोते, रणजित शिंदे, अमोल शिंदे, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, राजेंद्र गंगदे, कन्हैयालाल देवी, श्रीशैल बनशेट्टी, शोभा बनशेट्टी, सोमराज गायकवाड, सूर्योदित्य साळुंखे, देवानंद गुंड, नीता गुंड, अरविंद काळेल, चंद्रशेखर कोंडूभैरी, सुभाष गुळवे, भारत जाधव, शंकर पाटील, बाळासाहेब काटकर, श्रीधर कोडले, विशाल केवारे, प्रणव परिचारक, राजकुमार हंचाटे, समाधान आवताडे.

अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक, ज्येष्ठ उद्योजक उमेश परिचारक, माजी आमदार अ‍ॅड. धनाजी साठे तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे आदी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

Tags: DCC Bank
SendShareTweetSend
Previous Post

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003712
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group