Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 August 2026
in political
0
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

सांगोला, दि. 1 ऑगस्ट (प्रतिनिधी ः
सांगोला – पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ शिंदे सेनेकडे यावा व मंगेश चिवटे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी  मंत्र्यासह लोकप्रतिनिधीची ताकद महायुतीकडे लावली जाईल , शिक्षकांचे प्रलंबित मागण्या , जुनी पेन्शन योजना, टप्पा वाढ आदी प्रश्‍न आरोग्यदूत मंगेश चिवटे निश्‍चितच मार्गी लावतील असा विश्‍वास शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी  सांगोल्यात दिला. पुणे विधान परिषद विभागीय शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात मा.आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते झाला.

सांगोला येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, आदर्श पुरस्कार वितरण सोहळा, शिक्षक दरबार आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार  आरोग्यदूत  मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहरातील राजमाता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह येथे  उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार तसेच आदर्श समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील 25 शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्तांचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे,  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, उपसभापती अजय सरगर, युवा सेनेचे सागर पाटील, युवक नेते योगेश खटकाळे, गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम समितीचे सभापती माऊली तेली, नगरसेवक अरूण पाटील, नगरसेवक राजाभाऊ मदने,  नगरसेवक चैतन्य राऊत, माजी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती छाया मेटकरी, माजी नगरसेवक सतीश सावंत, सुरज जम्मा,  प्रा. संजय देशमुख, सोमेश यावलकर, अमित पाटील, उत्कर्ष पाटील, वैभव शेटे, विशाल पाटील, वैभव बोराडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 रूग्णांची अहोरात्र सेवा करणारा आरोग्यदूत आता शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडणुक लढविणार आहे. मंत्रालयातील गाढा अभ्यास असणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे हे शिक्षकांचे प्रश्‍न शासन दरबारी  नक्कीच सोडविणार असल्याचे मा.आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले. महायुतीतील जागावाटपात पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ शिवसेनेकडे यावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील, असे त्यांनी जाहीर केले.

योवळी पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघाबाबात मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.

यावेळी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. शिक्षकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, टप्पावाढीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, वैयक्तिक मान्यता व सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न विधिमंडळात प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्‍न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता सातत्याने शासन दरबारी मांडले जातील व  ते सोडविले जातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करेन तसेच प्रत्येक जिल्ह्यात संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांसाठी संघटना सातत्याने लढत असल्याचे सांगितले. शिक्षकांनी संघटित राहून आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सर्व शिक्षक बांधवांनी आजपासून अहोरात्र कामाला लागावे असे सांगितले.

कार्यक्रमानंतर आयोजित ’शिक्षक दरबार’ मध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, वैयक्तिक मान्यता, शंभर टक्के अनुदानित शिक्षकांचे प्रश्‍न, सेवा विषयक अडचणी, रिक्त पदे, प्रशासकीय अडथळे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक विषयांवर शिक्षकांनी आपली मते मांडली. उपस्थित अधिकार्‍यांनी व पदाधिकार्‍यांनी या प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी दिले.

पुरस्कार वितरण, शिक्षक दरबार, शिक्षकांच्या प्रश्‍नांवरील सखोल चर्चा आणि प्रचार शुभारंभ या चारही उपक्रमांमुळे कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यासाठी आहोरात्र काम करून त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे यांनी केले, तर आभार अमित पाटील यांनी मानले. 

Tags: #Mangesh chivateShahaji bapu Patil
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

Next Post

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या 'डॅम' पदमुक्त

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000436
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group