Friday, May 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2026
in political
0
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून विधान परिषदेचा आमदार निवडून दिला जाणार आहे. सत्ताधारी भाजपकडे सर्वाधिक मते असल्याने त्यांच्याकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण विरोधात सुद्धा तितकीच मते आहेत. त्यात सत्तेतीलच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मते आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे, या दोन्ही नेत्यांना जुळवाजुळव करावी लागणार आहे.

यापूर्वी झालेली विधान परिषदेची निवडणूक आठवत असेल तर त्या निवडणुकीत अशी जुळवा जुळव करण्यामध्ये ज्यांची सोलापूरच्या राजकारणात मास्टरमाइंड आणि चाणक्य म्हणून ओळख आहे ते सुरेश हसापुरे यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. संख्याबळ नसतानाही प्रशांत परिचारक हे विजयी झाले होते.

सुरेश हसापुरे यांच्या नावाशिवाय सोलापूरचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांच्या चाणक्यनीतीने कोणी स्वप्नात विचार केले नव्हते ती मंडळी मोठमोठे राजकीय पदे भोगली आहेत. 
सदस्य संख्या नसताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात, संख्या बळ नसताना तत्कालीन पालकमंत्र्यांना बाजार समितीच्या सभापती खुर्चीवर बसवले. काही नेत्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक करण्यात आणि त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदाच्या निवडीत सुद्धा हसापूरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती.

प्रणिती शिंदे यांच्या खासदारकीचे नियोजन हसापुरे यांनीच यशस्वी करून दाखवले. गेल्या वर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा हसापूरे यांनीच सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने यांना एकत्र आणून बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. दूध संघ असो की जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा बाजार समिती या सहकार क्षेत्रातील मोठ्या निवडणुकीचे प्लॅनिंग हसापूरे हेच यशस्वी करतात.

रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, संजय मामा शिंदे, प्रशांत परिचारक, राजा राऊत, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने या बड्या नेत्यांसोबत असलेली हसापुरे यांची मैत्री, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध त्यामुळे सर्वपक्षीय मित्र म्हणून ही त्यांची ओळख आहे.

सध्या ही विधान परिषद निवडणूक जरी भाजपला सोपी वाटत असली तरी तितकी सोपी नाही. आकडेवारी नुसार भाजप मजबूत आहे पण भाजपात गटबाजी असल्याने कुरघोड्या होण्याची शक्यता आहे. म्हणून विरोधात एकनाथ शिंदे यांचा उमेदवार जर आला तर फाईट होईल. तेव्हा सुरेश हसापुरे यांच्या सारख्या नेत्यांची निश्चितच जुळवाजुळव करायला दोन्ही कडे मदत लागणार हे नक्की आहे. त्यामुळे या नेत्याचे सोलापूरच्या राजकारणात अजूनही महत्त्व टिकून आहे.

Tags: @political newsBirthday wishesSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980865
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group