सोलापूर : अक्कलकोट जवळ झालेल्या एसटीच्या अपघातात सुमारे 35 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये सात ते आठ गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात मोठा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या महेश कोठे यांना फोन लावला आणि सिव्हीलमध्ये जाऊन चौकशी करण्याची सूचना केल्या.
आणि मुख्यमंत्री हे अपघातातील जखमीशी बोलणार असल्याने महेश कोठे तब्बल दीड तास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबून होते. शेवटी मंगेश चिमटे यांनी व्हिडिओ कॉल लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला महेश कोठे यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर अपघातात जखमी असलेल्या एक महिला आणि एक पुरुष यांच्याशी संवाद साधला.
आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत. प्रशासन तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल, कुणीही काळजी करू नका असा धीर मुख्यमंत्र्यांनी अपघातातील जखमींना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉल आला आणि ते काय म्हणाले पहा



















