सोलापूर : राज्य शासनाने 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाबाबत सरकारी सुट्टी जाहीर केली होती त्यामुळे सोलापुरात गुरुवार 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी राहणार नाही अशी माहिती सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. परंतु सोलापुरातील अनंत चतुर्दशी रोजीचे विसर्जन मिरवणूक पाहता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवार 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे आता शासकीय अधिकाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

















