स्व. विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर व कोठे’ज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड इंडोस्कॉपी सेंटरचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नेते स्व.विष्णुपंत कोठे यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व कावीळ तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन सोलापुरातील सुशील रसिक सभागृह येथे घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व धन्वंतरीदेवता, स्व. विष्णुपंत कोठे,स्व. कौशल्या कोठे, स्व.राजेश कोठे, यांच्या प्रतिमांचे पूजन करून व नामवंत डॉ. अरुण बाकळे, डॉ. अमजद सय्यद, डॉ. विशाल गोरे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. पूनम भुतडा, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आरिफ शेख, शिवलिंग कांबळे, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, श्रीनिवास चिल्का डॉ राधिका चिल्का , विनायक कोंड्याल, श्रीनिवास बोद्दूल, श्रुती सूर्यप्रकाश कोठे, सुहासिनी कोठे, डॉ. सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांच्या कार्याचे कौतुक करत सदर काम अधिक चांगल्या पद्धतीने करावे यासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व मार्गदर्शक डॉ. कोठे यांनी या शिबिरांतर्गत होणाऱ्या हेपेटाइटिस बी(कावीळ), हेपेटाइटिस सी(कावीळ), एल. एफ. टी. यकृतकार्य चाचणी, मधुमेह तपासणी, इसीजी, फायब्रो स्कॅन( यकृत कार्य तपासणी), डेंटल चेकअप आदि तपासण्या व मोफत औषधोपचार यांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या शिबिराचा लाभ सोलापुरातील 473 गरजू रुग्णांनी घेतला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष डांगे, हरिदास गायकवाड, शशिकांत कैंची, रमेश यन्नम, व्यंकटेश चिलका, सुधाकर गुंडेली, नागनाथ क्षीरसागर, बिज्जु प्रधाने, मदन क्षीरसागर, यशवंत ढेपे, विश्वनाथ पाटील, सुरजसिंह चौहान, सलाम शेख, ए.डी. चिनीवार, अंबादास चाबुकस्वार , नंदकुमार मुस्तारे, आनंद मुस्तारे, सुरेश कोकटनूर, नारायण माशाळकर, गिरीश कोटा, अजय पोंन्नम, काशिनाथ डोंगरे, मुकुंद चंदनशिवे, गिरीश कोटा, चंदप्पा केदार, निर्मलकुमार काकडे, पत्रकार शिवाजी सुरवसे, मधुकर आठवले, दिलीप कोल्हे, संजय शिंदे, पत्रकार अश्विनी तडवळकर, गणेश ननवरे यांनी सदिच्छा भेट दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देगाव नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली बेंद्रे- महिंद्रकर त्यांचे सहकारी कर्मचारी प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली, प्राचार्य नागेशकुमार काटकर, प्राचार्य अविनाश हजारे, प्राचार्या सुरा, मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली मॅडम, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, शिशुवर्गाच्या मुख्याध्यापिका सुरवसे, मुख्याध्यापिका रणसुभे, विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पा नायर, यांच्यासह संस्थेच्या सर्व विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोठेज क्लिनिकचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर मान्यवरांचे आभार विनायक कोंड्याल यांनी मानले.























