Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : शिवरंजनीच्या देशभक्ती गीतांनी ‘स्फुल्लिंग’ चेतले ; जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा केला सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 August 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर, दि.10(जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बुधवारी रंगभवन येथे आयोजित मराठी, हिंदी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांचे स्फुल्लिंग चेतले. या कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, शहीद कुटुंबीय, सैन्यात सेवा केलेल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाने सन्मान केला. 

रंगभवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासक डॉ श्रीकांत येळेगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार अंजली मरोड यांच्यासह महसूल अधिकारी उपस्थित होते.

डॉ. येळेगावकर यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूर जिल्ह्यातील महात्म्यांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे असलेले योगदान विषद केले. देशाच्या प्रगतीसाठी समता, बंधुता, एकता हवी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांच्या त्यागातून, बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांचे बलिदान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील पहिला हुतात्मा शंकर शिवदारे हे आहेत, त्यांना शिंदीची झाडे तोडणाऱ्या मुलांना सोडा म्हटल्याने गोळ्या घालण्यात आल्या होत्या, असे डॉ. येळेगावकर यांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांचे कुटुंबीय आणि वीरचक्र प्राप्त जवान यांचा सन्मान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या सन्मानासह तिरंगा ध्वजाचे वाटपही करण्यात आले. 

*माहिती पुस्तिकेचे प्रकाशन*

देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेले वीर जवान, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेले जिल्ह्यातील काही स्वातंत्र्यसैनिकांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने संकलित केली आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील काही दीपस्तंभ म्हणून माहिती पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,  निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते झाले.


*देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना वंदन*

शिवरंजनी सोलापूर प्रस्तूत वंदे मातरम हा मराठी, हिंदी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांना वंदन करण्यात आले. उन्मेश शहाणे दिग्दर्शित देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. 



पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. स्वत: पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी देशभक्तीपर गीत गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तसेच तहसीलदार अंजली मरोड यांनीही हर करम अपना करेंगे हे देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. 

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन नायब तहसीलदार संदीप लटके यांनी केले. यावेळी समृद्धी अनिल कारंडे हिने मैं उस भारत से आती हूं… कविता सादर केली.


SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मधुमेह व कावीळ तपासणी शिबिरात 473 जणांनी घेतला लाभ ; विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीदिनी आयोजन

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तिरंगा सेल्फी’ काढण्यासाठी नागरिकांची ‘झुंबड’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 'तिरंगा सेल्फी' काढण्यासाठी नागरिकांची 'झुंबड'

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002667
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group