Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आता मुंबईच नाही तर सोलापूरहून विमानाने बंगळुरूला ; मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाची दिली भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2025
in Airport
0
आता मुंबईच नाही तर सोलापूरहून विमानाने बंगळुरूला ; मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाची दिली भेट

Oplus_16908288

0
SHARES
554
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आता मुंबईच नाही तर सोलापूरहून विमानाने बंगळुरूला ; मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाची दिली भेट

सोलापूर : सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरवड्यात सोलापूर- मुंबई विमानसेवेची भेट दिली आहे. १५ ऑक्टोबर पासून सोलापूर – मुंबई आणि सोलापूर – बंगळुरू विमानसेवा सुरू होत आहे, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या प्रवासात मोठा टप्पा गाठल्याची समाधानकारक  प्रतिक्रिया सोलापूरकर व्यक्त करत आहेत.

सोलापुरातून मुंबईसाठी विमान सेवा सुरू व्हावी याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली येथील कार्यालयातील अनेक बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातदेखील आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी बाबत चर्चा केली होती.

यावेळी श्री. मोहोळ यांनी सोलापूरहून मुंबई तसेच बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू करू असे आश्वासन दिले होते. सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याने सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.

दोन्ही विमानसेवांचे बुकिंग २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
———–

अशा असतील विमानसेवेच्या वेळा

सोलापूर मुंबई दुपारी १२.५५ वाजता, मुंबई – सोलापूर दुपारी २.४५ वाजता, बंगळुरू – सोलापूर सकाळी ११ वाजता, सोलापूर – बंगळुरू दुपारी ४.१५ वाजता
————

‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे.
— मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
———–

देवा भाऊ आणि जया भाऊंकडून भरून निघतोय सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉक

महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयाभाऊ म्हणून लोकप्रिय असणारे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहेत. यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकत नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. मात्र सोलापुरातून गोवा, मुंबई, बंगळुरू आणि भविष्यात तिरुपतीलादेखील विमानसेवा सुरू होत आहे. टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली होणारा सोलापूरचा विकास हेच उत्तर असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करण्यापेक्षा भाजपा सरकार करत असलेल्या विकास कामातून बोध घ्यावा.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Tags: #Air servicesCM Devendra FadnvisMurlidhar mohol
SendShareTweetSend
Previous Post

प्रमोद गायकवाड यांच्यासह दोन मुलांचा जामीनअर्ज फेटाळला ; या चार आरोपीचा आदेश राखून ठेवला

Next Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002505
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group