सोलापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत हे दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. संपूर्ण एक दिवस ते सोलापूर शहर जिल्ह्यात असून या मॅरेथॉन दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम भेटीगाठी होणार आहेत. मागील काही दिवसात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील विविध मोठ्या हॉस्पिटलला अचानक भेटी पाहणी केल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या सोलापूर दौऱ्यात सिव्हील हॉस्पिटलला ते भेट देणार असल्याने सिव्हिलच्या सर्व कर्मचारी डॉक्टरांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोलापूर शहराच्या दौऱ्यात ते सर्व महापुरुषांना अभिवादन करून शहरातील विविध मोठ्या गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.























