सोलापूर : आगामी काळात दसरा सण व विविध जातीधर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व महानगरपालिका निवडणुकच्या दरम्यान सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरी करणारा सराईत गुन्हेगार नामे तेजस धर्मपाल कांबळे, वय-२१ वर्षे, राहणार ७५, गोकूळ नगर, जुळे सोलापूर हा विजापुर नाका पोलीस ठाणेच्या हद्दीत घरफोडी चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहे.
त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ, सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. त्यास दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजी विजापुर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवून, सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.



















