Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांनी घेतली लोकप्रतिनिधींची बैठक ; पंढरपूरचा विकास वाराणसीच्या धर्तीवर, असा असेल आराखडा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.12 (जिमाका) : श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व  मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना, मते विचारत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

जिल्हा नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामाबाबत आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह वारकरी संस्थानचे विश्वस्त, महाराज मंडळी, पंढरपूर येथील स्थानिक व्यापारी, नागरिक उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी यांनी लेखी सूचना आठवडाभरात द्याव्यात, याचाही विचार करण्यात येणार आहे.

आषाढी यात्रा कालावधीत पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी पालखी तळ अपुरे पडत असल्याने पालखी तळांचा देखील विस्तार करण्याबाबत या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी यांच्या सूचनांही जाणून घेतल्या जातील. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरातील विद्युत रोहित्रे एकाच ठिकाणी एकत्र बसविण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदीवरील नवीन घाट निर्मिती प्रस्तावित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

*सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली*

नागरिकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालये एकच छताखाली आणण्याचा विचार आहे. यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नवीन प्रस्तावित आराखड्याबाबत कोणाला अधिकच्या सूचना द्यायच्या असतील तर स्थानिक पातळीवर प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय येथे द्याव्यात. लेखी सूचनांचाही विचार केला जाईल, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले

पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या असते. त्यांना तत्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी प्रांताधिकारीऐवजी अप्पर जिल्हाधिकारी या दर्जाच्या पदाची मागणी आराखड्यात करण्यात आली आहे. काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी शिष्टमंडळाकडून केलेल्या पाहणीची माहिती जिल्हाधिकारी श्री.शंभरकर यांनी दिली.

*वाहनतळाची संख्या वाढविणार*

पंढरपुरात भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात 1060 वाहने पार्क होतील एवढी क्षमता आहे. यामुळे शहरात सात ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शॉपिंग सेंटरसह वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यामुळे आणखी 2200 चार चाकी वाहने पार्किंग होतील, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

मंदिर परिसर, मंदिर आणि दर्शनबारी याठिकाणी सोयीसुविधा देणे, 28 परिवार देवतांची मंदिरे यांचाही समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांना समजण्यासाठी चिन्हे, खुणा, सूचना फलक लावण्यात येणार आहेत. 

*वाराणसीच्या धर्तीवर घाट, महाआरतीचे नियोजन करावे-खासदार महास्वामी*

वाराणसी येथील घाटाप्रमाणे घाट बांधणी करावी. घाट बांधणीसाठी तज्ञ मंडळींचा समावेश करावा. तसेच चंद्रभागा नदीकाठी महाआरती बाबतही नियोजन करावे, अशा सूचना खासदार डॉ. महास्वामी यांनी केल्या.

पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांसह श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण यंत्राच्या क्षमतेत वाढ करावी. अंबाबाई मैदानाची जागा खेळण्यासाठी रहावी, कॉक्रिटीकरण करू नका, अशा सूचना आमदार श्री. आवताडे यांनी मांडल्या.

 मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने याठिकाणी गर्दी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. मंदिर परिसरात चप्पल स्टॅंड, वाहन तळांवर इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करावी. शिवाय चंद्रभागा नदीत येणारे घाण पाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. पाणी तपासणी यंत्रणा बसविण्याची सूचना आमदार मोहिते- पाटील यांनी मांडली. 

मंदिराचा विकास करताना मंदिर परिसरातील परिवार देवतांचाही विकास करावा. पूर्वीच्या गटार व्यवस्थेबरोबर दुसरी व्यवस्था करावी. नदीकाठी महाआरतीचेही नियोजन व्हावे, गोपाळपूर येथील नगरपालिकेच्या हद्दीतील जागेमध्ये सोलर प्लांट टाकण्याबाबत प्रस्तावित करावे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या जात पडताळणी कार्यालयाचे विद्यार्थ्यांना महत्वाचे आवाहन ; विद्यार्थ्यांनों……

Next Post

सराईत गुन्हेगार तेजस कांबळे दोन वर्षाकरिता तडीपार | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सराईत गुन्हेगार तेजस कांबळे दोन वर्षाकरिता तडीपार | Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002645
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group