Tuesday, March 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रियकरासोबत कट रचून पतीचा खून : आरोपी प्रियकरासह मयताच्यापत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; गुन्हे शाखेकडून 24 तासात गुन्हा उघड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 September 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर :  २१ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास जुने बिडी घरकुल, सोलापुर येथील राज मेमोरीयल शाळेजवळ दशरथ नागनाथ नारायणकर या इसमाचा खुन झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, सोलापुर शहर येथे मिळाली. पोलीस नियंत्रण कक्ष येथून सदरची माहिती एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गुन्हे शाखा कार्यालय तसेच वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली.

पोलीस नियंत्रण कक्ष येथुन मिळालेल्या माहितीचे आधारे,उपायुक्त बापू बांगर, गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, वपोनि सुनिल दोरगे, सपोनि संजय क्षीरसागर, सपोनि महाडीक, सपोनि  संदीप पाटील यांनी तसेच यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेबाबत एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुध्द भादवि कलम ३०२ अन्वये, वर नमुद मयताची पत्नी अरुणा दशरथ नारायणकर हिने फिर्याद दिलेवरुन गुन्हा दाखल झाला.

गुन्हे शाखेकडील वरील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, घटनेची माहिती, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांना देण्यात आली. तद्नंतर, पोलीस आयुक्त यांचे सुचनेनुसार  बापू बांगर, उप-आयुक्त गुन्हे शाखा, डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन गुन्हे शाखेकडील वरील अधिकारी यांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले.

त्यानुसार गुन्हे शाखेकडील ०३ तपास पथके सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी प्रयत्न करीत होते. त्या दरम्यान, सपोनि संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पोना महेश शिंदे, पोना कृष्णात कोळी, पोकॉ राजु मुदगल, पोकॉ कुमार शेळके, मपोना निलोफर तांबोळी यांनी, मयत इसम दशरथ नागनाथ नारायणकर व त्याची पत्नी अरुणा नारायणकर यांचेबाबत घटनास्थळावरुन तसेच त्यांचे मुळ गाव डोंबरजवळगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर येथून, तेथील गोपनिय बातमीदारांकडुन माहिती प्राप्त केली. घटनास्थळी दिसुन आलेली परिस्थिती आणि गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीचे आधारे, सपोनि संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचा संशय मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिचेकडे वळाला. त्याबाबत सपोनि संजय क्षीरसागर यांनी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर, वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि क्षीरसागर यांनी, मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिचे प्रेमसंबंध बाबासो जालींदर बाळशंकर याचेशी असल्याची माहिती मिळविली. मयत दशरथ नारायणकर हा त्याची पत्नी अरुणा व त्याची १२ वर्षाची मुलगी यांचेसह गेली ०३ महिण्यापासून जुना विडी घरकुल येथे राहत असल्याची तसेच या ३ महिण्याचे कालावधीत, बाबासो जालोदर बाळशंकर हा, अरुणा नारायणकर हिला वारंवार भेटल्याची माहिती सपोनि क्षीरसागर यांना मिळाली. तसेच घटनेच्या दिवशीही सकाळी, बाबासो बाळशंकर यास घटनास्थळाजवळ लोकांनी पाहोल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर क्षीरसागर यांनी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईल नंबर बाबत माहिती मिळविली. त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळुन आल्यानं त्याचेवर अधिकच संशय बळावला. त्यानंतर संशयीता बाबत अधिक माहिती घेतली असता, तो देखील डोंबरजवळगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर येथे राहत असल्याचे समजले. तसेच घटना घडलेल्या रात्री तो त्याचे राहते घरी नव्हता आणि घटनेनंतर ३ ते ४ तासांनी तो गावी आल्याचे समजले. तसेच दिनांक २१/०९/२०२२ रोजी रात्री तो मुळे गाव क्रॉस रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि  क्षिरसागर यांनी दिनांक २१/०९/२०२२ रोजी २१.३० वाचे सुमारास, बाबासो जालींदर बाळशंकर यास मुळेगाव क्रॉसरोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे सखोल आणि कौशल्यपूर्वक तपास केला असता, बाबासो जालीदर बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी गेली ७ ते ८ वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. तसेच त्या प्रेमसंबंधातुन दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिचेशी संगणमत व कट करुन केल्याची कबुली दिली.

त्या अनुषंगाने, सपोनि क्षिरसागर यांनी आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईलची पाहणी केली असता, त्यामध्ये मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिने त्यास पाठविलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची माहिती मिळाली. त्या चॅटवरुन, आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी संगणमत करून, कट रचून, खुनाची पुर्वतयारी साठी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी व चाकु खरेदी करुन, दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, अरुणा नारायणकर हिचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, तिने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, बाबासो बाळशंकर याचे मोबाईल मधील चॅट विषयी माहिती दिली असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे १) बाबासो जालींदर बाळशंकर वय २७ वर्षे, रा. डॉबर जवळगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर व २) अरुणा दशरथ नाराणकर, वय-२९ वर्षे, रा. जुने विडी घरकुल, सोलापुर यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर सपाटे अडचणीत ; समाज गेला विरोधात | Solapur

Next Post

सोलापुरातून दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे गटाचे 25 हजार शिवसैनिक जाणार ; काय आहे हिंदू गर्व गर्जना मोहीम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातून दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे गटाचे 25 हजार शिवसैनिक जाणार ; काय आहे हिंदू गर्व गर्जना मोहीम

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973060
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group