सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर इथला शेतकरी यशवंत लक्ष्मण लोहार यांनी लोकमंगल शुगर भंडारकवठे व आयडीबीआय बँक नवी पेठ शाखा यांच्याकडून फसवणूक झाल्या प्रकरणी बँकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करून लक्ष वेधले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती आप्पाराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यानी आंदोलनास पाठिंबा दिला.
लोहार यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, सोलापूरची आयडीबीआय बँक तसेच भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर अँड इथेनॉल को-जनरेशन (Lokmangal_shugars) या कारखान्याने संगणमत करून शेतकरी यशवंत लोहार यांच्या नावे बनावट कागदपत्र करून 33 लाखाचे पीक कर्ज काढले, नंतर 16 लाख 33 हजार रुपयास वनटाइम सेटलमेंट केली, सेटलमेंट केल्याने लोहार यांना आता कोणत्याही बँकेमधून कर्ज मिळत नाही, त्यांच्या जेव्हा हे सत्य समोर आले, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पाराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आयडीबीआय बँकेसमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला, ऍड सागर पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख (MLA_Subhash_Deshmukh) यांच्याविरुद्ध ‘मनी लॉन्ड्रीग ऍक्ट’खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कोरे यांनी सांगितले की, शेतकरी यशवंत लोहार यांनी सोलापुरात आंदोलन करत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र या प्रकरणाची सविस्तर कागदपत्रे हे कारखान्याकडे असल्याने पोलिसांनी हा गुन्हा मंद्रूप पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.



















