‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान
सोलापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राने द पॉवर 50 हा पुरस्कार देऊन गौरव केला.
विशेष म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला.
सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी आपली छाप सोडली आहे. कामा प्रति प्रामाणिक अशी त्यांची ओळख आहे. टेक्निकल बाबींमध्ये ते प्रचंड अभ्यासू आहेत. झेडपीतील एक दिलखुलास व्यक्तिमत्व, चांगला खेळाडू, उत्तम गायक म्हणून ओळख आहे.