सोलापूर : सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा नजीक अशोक हॉटेलच्या समोर दुचाकी व मालवाहतूक हायवाच्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन्ही युवक जागीच ठार झाले ही घटना सायंकाळी सहा च्या सुमारास घडली.
मयत दोन्ही युवकांचे ओळख पटलेली नाही मृतदेह लादेन यांच्या ॲम्बुलन्स मध्ये घालून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.
या ठिकाणी एम एच 13 डी क्यू 4010 ही अशोक लेलंड मालवाहतूक हायवा मी तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने येत होती तर एम एच 13 डी एच 0074 या दुचाकी वाहनावरून दोन्ही युवक तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने येत होते मालवाहतूक गाडीच्या आडवे आले आणि त्यामुळे गाडीची मागून जोराची धडक होऊन दोघे जागीच ठार झाले. असे नागरिकांकडून सांगण्यात आले.



















