Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध दाखल्यांच्या वाटपाने सेवा पंधरवड्याची सांगता ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या प्रशासनाला सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 October 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.2 (जिमाका) : सेवा पंधरवड्यामध्ये सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. त्यामध्ये काही विभागांनी एकही प्रलंबित प्रकरण ठेवलेले नाही. उर्वरित विभागानी प्राप्त प्रकरणाचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात सेवा पंधरवडा सांगता समारोप, महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी श्री  शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी, संजय गांधी योजनेच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्यासह आरोग्य, पोलीस, महसूल विभाग, महावितरण विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी , कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 श्री शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील प्राप्त प्रकरणे ज्या दिवशी प्राप्त होतील त्या दिवसापासूनच त्यावर कार्यवाही सुरू करावी, असे केल्यास कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही. प्रशासन आपले आहे, असे नागरिकांना वाटावे, असे काम करा.  लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी प्रयत्न करा.

यावेळी श्रीमती पवार यांनी सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांविषयी केलेल्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच शासनाच्या किती सेवा नागरिक विनासायास ऑनलाईन यंत्रणेव्दारे घेऊ शकतात याबद्दलची माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना 7/12 उतारे, संजय गांधी योजना, शिधापत्रिका, अपंगत्व प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, कंत्राटी कामगार लायसन्स तसेच मोहोळ, दुधनी, अक्कलकोट, मंगळवेढा नगरपरिषदमार्फत मिळणारे बांधकाम परवाने, पंतप्रधान आवास योजनेचे धनादेश, ई सेवा केंद्रामार्फत मिळणारे विविध दाखले, इत्यादींचे वाटप जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन अव्वल कारकून अमर भिंगे यांनी केले तर आभार तहसिलदार अंजली कुलकर्णी यांनी मानले.

या कार्यक्रमापूर्वी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

0000

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दौरा ठरला ; भरगच्च बैठका व कार्यक्रम

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघे जागीच ठार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघे जागीच ठार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002564
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group