सोलापूर : महाराष्ट्र राज्य सरकारी मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर अंतर्गत सोलापूर जिल्हा कार्यकारीणी तयार करण्याच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे जिल्ह्यातील लघुलेखकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकारी स्टेनोग्राफर असोसिएशन सोलापूर जिल्हा कार्यकारणी तयार करण्यात आलेली असून, त्यास मान्यता प्रदान करणेची विनंती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी राहुल कुलकर्णी, उपाध्यक्ष पदी महादेव फुलसरे, सचिव पदी शंकर कांबळे, सहसचिव अनुराधा मुळे, कोषाध्यक्ष राघवेंद्र भंडारे, सह कोषाध्यक्ष गजानन खटके, सदस्य म्हणून प्रदीप शिंदे, संगप्पा कोणदे, अमोल सोनवणे, महेश कोठाने, अमोल भुरे, विशाल पवार, सिद्धनाथ जाधव, माधवी पारेकर, श्रीमती पतंगे यांचा समावेश आहे.


















