Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ‘दे-शिं-दे’ चीच चर्चा ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वेधले लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सोलापूरचा पालकमंत्री कोण याचीही प्रचंड उत्सुकता होती शेवटी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोलापूरचे पालकमंत्री पद आले.

 विखे पाटलांनी सोलापुरात प्रवेश करताच शहरात जितके महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सर्वांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचेही दर्शन घेतले. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक हेरिटेज लॉन मध्ये घेण्यात आली. एकूणच पालकमंत्र्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख हे कुठेच दिसले नाहीत मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते हजर होते.

 यावेळी राजकीय योगायोग दिसून आला, पहिल्या रांगेमध्ये आमदार बसले होते त्या रांगेत तीन शिंदे आमदार एकाच बाजूला दिसून आले. विशेष म्हणजे आमदार सुभाष देशमुख, त्यांच्यानंतर आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या बाजूला आमदार विजयकुमार देशमुख अशी बैठक व्यवस्था दिसून आली. सोलापूर शहरांमध्ये असलेल्या विधानसभेच्या तीन मतदारसंघानुसार आमदार बसल्याचे दिसत होते.  या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही देशमुख आमदार तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांवर चांगलाच आवाज उठवला.

 विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडा संकुलाचा विषय, सोलापूर विमानतळाचा विषय तसेच मुळेगाव क्रॉस रोड या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल बांधावा असे महत्त्वाचे विषय मांडले. आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळ, मल्लिकार्जुन नगर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल, शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक नळ तोडणीच्या कारवाई विरोधात आवाज उठवत या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली तसेच विजेचा शॉक लागून तरुणांचे मृत्यू झाले आहेत या मोठ्या वीज प्रवाहाच्या लाईन लवकरात लवकर अंडरग्राउंड करा यासह रेल्वेच्या जागेत अनेक झोपडपट्टी आहेत वर्षानुवर्ष लोक तिथे राहत आहेत त्यावर संयुक्त बैठक लावून तोडगा काढावा अशा मागण्या केल्या. आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील टेंडरच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली,  हद्दवाढ भागामध्ये जिल्हा परिषदेच्या असलेल्या शाळा महापालिकेकडे हस्तांतर करा अशी मागणी त्यांच्याकडून पुन्हा आली तसेच सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाईलाही त्यांनी विरोध केला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सरकारी स्टेनोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहुल कुलकर्णी तर सचिव शंकर कांबळे ; सोलापूर जिल्हा कार्यकारिणी तयार

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनी अभिवादन ; नागरिकांशी साधला संवाद ; सेल्फी घेण्यासाठी गर्दी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनी अभिवादन ; नागरिकांशी साधला संवाद ; सेल्फी घेण्यासाठी गर्दी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002557
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group