सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोलापूर शहरात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साही वातावरणात लेझीम ताफ्यासह मिरवणुका काढून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी अबालवृद्ध समाज बांधवांची अलोट गर्दी झाली होती. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
अभिवादनासाठीच्या या गर्दीत जिल्हाधिकारी शंभरकर यांना पाहताच अबालवृद्ध व समाज बांधवांनी त्यांच्या समवेत फोटो काढले. काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी फोटोही घेतला. दरम्यान, याप्रसंगी फोटो घेत असतानाच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या सर्वांची विचारपूस केली. हितगुज साधलं. विद्यार्थ्यांना आपुलकीने विचारणा केली. अलोट गर्दीतही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधला.
दरम्यान. त्यानंतर तेथून पायी चालत जाऊन नॉर्थ कोट मैदान येथील समता सैनिक दलाच्या धम्म संस्कार सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावली.





















