Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; संशयित महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 April 2025
in crime
0
Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर
0
SHARES
985
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; संशयित महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून या प्रकरणात हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा महेश माने उर्फ मुसळे या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तिला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे.

याप्रकरणी आरोपीचे वकील एडवोकेट प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद केला की, एफ.आय.आर.चे अवलोकन केले असता आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले याबाबत कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. आरोपाप्रमाणे दिनांक 17/04/2025 रोजी महिला आरोपी मनीषा यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या अधिकृत ईमेलवर पत्र पाठवले, त्यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये तिचे अधिकार कमी केल्याबाबत, तिचा पगार कपात केला जातो, वगैरे त्यामुळे ती आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसंगकर यांचे नाव घेणार आहे अशा आशयाचा मेल पाठवला, तदनंतर दिनांक 18/04/2025 रोजी डॉक्टर वळसंगकर व त्यांच्या पत्नीने आरोपी महिलेस हॉस्पिटल मध्ये बोलावून समजावून सांगितले.

त्यावेळी आरोपीने तिची चूक झाल्याचे सांगून माफी मागितली, पत्र फाडून टाकले, तदनंतर सायंकाळी डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केली, डॉक्टरांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये नमूद होते की, “ज्या माणसाला मी शिकवून आज A.O. केले आहे आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे याचे मला आतीव दुःख आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.”

सदर चिट्ठीच्या आधारे आरोपी महिलेला सदर बझार पोलिसांनी अटक केली. तपास अधिकारी लकडे यांनी चिठ्ठी जप्त करावयाची आहे, प्रकरणाचा तपास करावयाचा आहे, ईमेल द्वारे पाठवलेली सदर चिठ्ठी ची प्रत जी महिला आरोपीने फाडली त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत, घाणेरडे व खोटे आरोप याबाबत तपास करावयाचा आहे असे पोलीस कोठडीची कारणे मांडली.

यात आरोपीतर्फे पोलीसांनी मागितलेल्या पोलीस कोठडीचे मागणीस विरोध करून युक्तिवाद करण्यात आला की, “पोलिसांचे कथनानुसार ईमेल द्वारे पाठवलेली चिठ्ठी जप्त केली आहे त्यामुळे ते पोलीस कोठडीचे कारण होऊ शकत नाही, सदर चिठ्ठी फिर्यादी हॉस्पिटलमध्ये फाडली ती फिर्यादी हॉस्पिटल च्या ताब्यात आहे त्यामुळे ते सुद्धा आरोपीच्या पोलीस कस्टडीची कारण होऊ शकणार नाही, पाठवलेला मेल हा टाईप असल्यामुळे आरोपीचे हस्ताक्षर घेण्याची गरज नाही, सदर प्रकरणात वस्तुस्थिति वेगळी आहे ती लपविण्यासाठी खोटी फिर्याद आरोपीविरुद्ध केली आहे” आरोपी व फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे एडवोकेट शिल्पा बनसोडे या काम पाहत आहेत.

Tags: Dr Shirish valsangkarSolapur crimeSuiside
SendShareTweetSend
Previous Post

दोन्ही देशमुखांच्या बैठकीला काँग्रेसचे म्हेत्रे, शेळके, चाकोते तर राष्ट्रवादीचे साठे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरली !

Next Post

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भीमसैनिकांना शुभेच्छा द्यायला वेळ नाही ; आनंद चंदनशिवे यांची नाराजी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990216
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group