Wednesday, February 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 March 2025
in Co -operative
0
मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले
0
SHARES
590
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांची प्रशासक ही नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसा निकाल शुक्रवारी सकाळी न्यायालयाने दिला. यापूर्वी मोहन निंबाळकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते त्यानंतर ते काही महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक पदावर जॉईन झाले परंतु काही दिवसातच त्यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागेवर शहर उपनिबंधक प्रगती बागल यांची नियुक्ती झाली पण पंधरा दिवसातच पुन्हा मोहन निंबाळकर यांनी प्रशासक पदाची ऑर्डर आणली. गुरुवार 20 मार्च रोजी ते जॉईन झाले. केवळ एका दिवसातच त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सारखं जायचं अन् यायचं ते अधिकाऱ्यांना कितपत योग्य वाटतं. का एवढा त्रास करून घ्यायचा म्हणून आता निंबाळकर साहेब बस झाले राव ! पुन्हा येऊ नका असा मजेशीर सूर सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदावर दुसऱ्यांदा फेर नियुक्ती करून घेतलेल्या मोहन निंबाळकर यांची चक्क 24 तासातच पुन्हा उचलबांगडी झाली आहे.राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे नेते डाॅ.बसवराज बगले यांनी दाखल केलेल्या तातडीच्या याचिकेवर निकाल देऊन मुंबई उच्च न्यायालयाने निंबाळकर यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.व त्यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे येथे पणन विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीला हरकत घेऊन त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाबद्दल राष्ट्रवादीचे नेते डाॅ.बसवराज बगले यांनी पणनमंत्री आणि प्रधान सचिंवाकडे पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या,त्यावर पणन संचालकांचा खुलासा सरकारने मागविला होता.शिवाय जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यवहार करून बेकायदेशीर कामकाजाचा सपाटा लावल्याने त्यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी सुध्दा गंभीर आरोपांचा अहवाल सादर केला होता. डाॅ.बगले यांच्या आरोपात तथ्य असल्यामुळे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी निंबाळकर यांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार निंबाळकर यांना सोलापूर बाजार समितीच्या प्रशासक पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले होते.

प्रशासक पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्या संस्थेच्या कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना मोहन निंबाळकर यांनी हुकुमशाही पध्दतीने पणन संचालकांशी संगनमत करून बेकायदेशीर कामकाज करीत असल्याबद्दल डाॅ.बगले यांनी तक्रारी केल्या होत्या,त्याची चौकशी करून कारवाई करा असे आदेश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते.मात्र त्यांच पणनमंत्र्यांनी पून्हा निंबाळकर यांचीच फेर नियुक्ती करण्यासाठीचे फर्मान सोडले होते. त्यानुसार निंबाळकर यांनी गुरूवार दि.20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एकतर्फी पदभार घेतला होता.मात्र बगले यांच्या तत्परतेमुळे निंबाळकर यांची अवघ्या 24 तासात पुन्हा दुसर्‍यांदा उचलबांगडी झाली आहे.त्यामुळे बाजारात पुन्हा खमंग चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात क्र – 4073 /25 ही आव्हान याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती डाॅ.बगले यांनी गुरूवारी केली होती.त्यानुसार शुक्रवारी सकाळीच न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यापुढे युक्तीवाद झाला. युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे, दाखल केलेले पुरावे,जिल्हा उपनिबंधकांचा गंभीर व वस्तुनिष्ठ अहवाल आणि शासनाने केलेली चूक लक्षात घेऊन मोहन निंबाळकर यांच्या नियुक्ती आदेशाला न्यायमूर्तींनी स्थगिती दिली आणि दोन आठवड्यात निंबाळकरांच्या नियुक्तीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.प्रशासक निंबाळकरांना तात्काळ बाजार समितीचा पदभार सोडण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या सुनावणीत डाॅ.बगले यांच्याकडून प्रसिध्द विधिज्ञ ॲड. गुरबाळा बिराजदार यांनी काम पाहिले.

Tags: Mohan nimbalkarMumbai High courtPragati Bagalप्रशासकबसवराज बगलेसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट ! सिईओ जंगम यांचे कामांचे कौतुक

Next Post

श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष पदी संदीप महाले, कार्याध्यक्ष पदी बंटी क्षीरसागर

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970740
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group