सोलापूर : महाराष्ट्राच्या गृह विभागाने सोमवारी राज्यातील 104 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदलीने पदस्थापना दिली आहे यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर व पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली धाटे यांची बदली झाली आहे. याचबरोबर सोलापूर च्या तात्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होत्या त्यांना मुंबई शहरात पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
डॉक्टर दिपाली धाटे यांना अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण पदावर नियुक्ती मिळाली असून बापू बांगर यांना साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती मिळाली आहे.
नाशिक ट्रेनिंग सेंटरला प्राचार्य असलेल्या डॉक्टर दिपाली काळे या पुन्हा सोलापूरला पोलीस उपायुक्त पदी आल्या आहेत. तर पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची सोलापूर शहर पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे.


















