सोलापूर : नीलम नगर एमआयडीसी जवळील अनेक टॉवर कारखान्यांना शनिवारी रात्री सातच्या सुमारास भीषण आग लागली एक कारखाना पेठ घेतल्याने शेजारचे कारखाने ही पेटल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहिती नुसार 3ते 4 कारखान्याला लागली आग लागली आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आगीमध्ये कोट्यावधीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही अद्याप नुकसान किती झाले आहे याची माहिती मिळू शकली नाही. या आगीमध्ये कोणतीही जीवित आणि झाली नसल्याची माहिती असून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे.


















