Wednesday, September 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चार पिस्तूल 24 जिवंत काडतूस जप्त ; जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपी लागला ग्रामीण पोलिसांच्या हाती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 February 2025
in crime
0
चार पिस्तूल 24 जिवंत काडतूस जप्त ; जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपी लागला ग्रामीण पोलिसांच्या हाती

oplus_2

0
SHARES
666
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चार पिस्तूल 24 जिवंत काडतूस जप्त ; जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपी लागला ग्रामीण पोलिसांच्या हाती

सोलापूर : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारासह अटक करत त्यांच्याकडील चार पिस्टल व 24 जिवंत काडतुस जप्त केली आहेत.

फाईक मुस्ताक कळमबेकर, राहणार शिवाजीनगर मिस्त्री विला रत्नागिरी या आरोपीला खूनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे तसेच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगळवेढ्यात एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून तो सध्या जामिनावर आहे व राजकुमार हनुमंत बिराजदार असे पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

राज्यात सध्या परवानाधारक व अवैद्य अग्नि शस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे लक्ष होते त्याचा अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या मागे होते. त्यामध्ये वायकर व कॉन्स्टेबल प्रकाश कारटक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे फारूक कळमबेकर हा जंगलगी तालुका मंगळवेढा गावच्या शिवारात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगून आहे अशी बातमी मिळाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले. जंगलगी गावातील राजकुमार बिराजदार यांच्या शेतात इसमांवर वॉच ठेवून थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा ही इसम दिसून आला व त्याच्या हालचालीवरून त्याच गराडा घालून जागीच पकडले.

त्या इसमाने आपले नाव फारूक कळमबेकर असे सांगितले. त्याला तपासले असता कमरेच्या डाव्या बाजूस पँट मध्ये खोचलेली एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह व त्यांच्या उजव्या खिशातून पाच जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता सदर आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती तो सदरची शिक्षा ही कळंबा जेल कोल्हापूर येथे भोगत असताना तेथून पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात हजर झाला नव्हता. पोलिसांना त्याचा ठाण टिकावा लागू नये म्हणून रत्नागिरी येथून प्रसार होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे बिराजदार यांच्या शेतात राहत होता त्यांच्याकडे मिळून आलेले पिस्टल हे त्यांनी निंगोडा बिराजदार यांच्याकडून घेतले होते.

यामुळे निंबोडा बिराजदार यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या राहते घरात तीन बनावटी पिस्टल व 18 जिवंत काडतुस ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून लगेच बिराजदार बंधू त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरामध्ये आणखी तीन बनावटी पिस्टल व 18 जिवंत काढतोस मिळून आले आहेत सदरचे पिस्टल हे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारटक, विरेश कलशेट्टी, अश्विनी गोटे, कॉन्स्टेबल अजय वाघमारे, हरीश थोरात, राहुल दोरकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार अन्वर आत्तार, बाळराजे घाडगे यांनी बजावली.

Tags: LCB SolapurPistalSolapur rural police
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात अँटीकरप्शनची रेड ; वरिष्ठ सहाय्यकास उचलले

Next Post

मुख्यमंत्री, आम्हाला मुदतवाढ द्या ! सोलापुरात शेकडो युवकांचे आत्मक्लेष आंदोलन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मुख्यमंत्री, आम्हाला मुदतवाढ द्या ! सोलापुरात शेकडो युवकांचे आत्मक्लेष आंदोलन

मुख्यमंत्री, आम्हाला मुदतवाढ द्या ! सोलापुरात शेकडो युवकांचे आत्मक्लेष आंदोलन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000320
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group