सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची नागपूर वस्त्रोद्योग उपसंचालक पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर शितल उगले या नव्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास नव्या आयुक्तांचे महानगरपालिकेत आगमन झाले. यावेळी त्यांचे औक्षण करून सोलापुरात स्वागत करण्यात आले महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले.
तसेच सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथम महिला आयुक्तपदी रुजू झाल्याबद्दल शितल (तेली) उगले यांचा ट्रेड युनियनच्या वतीने हार्दिक स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले,महिला प्रमुख संघटक अंजली काकडे,कार्याध्यक्ष योहान कानेपागुलु,गौतम नागटिळक ,पिंटू जेटीथोर, चंद्रकांत रणदिवे,राजश्री सगर,क्षमा डबारे, संगीता गुरव,संगीता लेकुरवाळे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पदभार घेतल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करताना काय सांगितले पहा





















