Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काळ्या डोक्याचा शराटी पक्षी फसला दोन झाडांच्या मध्ये अडकलेल्या पतंग मांज्यात ; वन्यजीव प्रेमींनी अशा प्रकारे केली सुटका पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विजयपुर रोडवरील सोनी नगर परिसरात दोन निलगीर झाडांच्या मध्ये पतंगचा मांज्या लटकत होता. शराटी पक्षी त्याच मार्गावरून उडत असताना त्यात त्याचे पंख फसले व उलटा लटकु लागला.

सोनी परिसरातील रहिवासी सोलापुरे ह्यांनी घटनेची माहिती वाईल्ड लाईफ केअर संस्था सदस्यांना कळवली. प्रविण जेऊरे, पांडुरंग राऊत,  तेजस म्हेत्रे, अभास कमलापुरे, गणेश तुपदोळे, अक्षय फुले व मुकुंद शेटे घटनास्थळी पोहचले.

तेव्हा काळ्या डोक्याचा शराटी (ब्लॅक हेडेड आयबीस) दोन झाडांच्या मधील पतंग मांज्यात फसलेला आढळला. उलटा लटकलेल्या पक्षीची सुटण्यासाठी प्रचंड धडपड सुरू होती. परंतु मांज्या आणखी घट्ट आवळत चालला होता. साधारण तीस फुट उंचीवर फसलेल्या शराटीला काढण्याचे प्रयत्न सुरू केले. 

लोंबकळत असलेला मांज्या बांबूस हुक लावून खाली खेचण्यात आला. तसा पक्षी खाली खाली येत होता.पक्षी खाली येताच त्याचे कापडाने डोळे झाकण्यात आले. जेणे करुन तो जास्त घाबरुन जाऊ नये.

पंखात फसलेला सर्व मांज्या काढण्यात आला. पक्षीची सर्व तपासणी केली असता कोणतीही जखम आढळून आली नाही.

प्रचंड घाबरलेल्या शराटी पक्षास तात्काळ सोडले असता तो कशाला तरी धडकण्याची शक्यता होती. हा धोका ओळखुन शराटी पक्षीस एका बॉक्स मध्ये बंद ठेवण्यात आले. अर्धातासाने त्याच परिसरात बॉक्स  उघडला असता शराटी पक्षाने जोरदार आकाशात झेप घेतली.

उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून पक्षीस पुढील निसर्ग मुक्त जीवनास शुभेच्छा दिल्या. 

पहाता पहाता पक्षी उडत उडत डोळ्या आड निघून गेला. काळ्या डोक्याचा शराटी- भारतात सर्वत्र आढणारा पाणथळ परिसरात दिसणारा पक्षी. डोके ,चोच, व मान व पाय काळे रंगाचे असते तर सर्व शरीर पांढरे असते. पाणथळ परिसरात तलाव, नदी, भातशेती, धरण परिसरात हामकास दिसून येतात. गोगलगाई, मासोळी, बेडुक पानकिटक, गांडुळं हे त्याचे खाद्य आहे.  कुदळ सारखी चोच सतत पाणथळ चिखलात मारताना दिसतो. म्हणून ग्रामीण भागात ह्याला कुदळ्या पक्षी म्हणतात.

SendShareTweetSend
Previous Post

कार्यक्रम अहमदनगरचा कौतुक सोलापूरचे ; जिल्हाधिकाऱ्यांचे धन्यवाद, नेमके नितीन गडकरी काय म्हणाले पहा | Video

Next Post

नव्या महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी पदभार स्वीकारला ; पहा असे झाले स्वागत, सोलापूरकरांना दिली ही ग्वाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नव्या महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी पदभार स्वीकारला ; पहा असे झाले स्वागत, सोलापूरकरांना दिली ही ग्वाही

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979733
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group