सोलापुरात भाजयुमोने घेतला पुढाकार ; तरुणांचा भाजप सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; या मतदारसंघात…
भारतीय जनता युवा मोर्चा वतीने आज शहर मध्य विधानसभा मतदारसंघात संघटन पर्व अंतर्गत भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे यांच्या सूचनेनुसार शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यता अभियान वालचंद महाविद्यालय येथे घेण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयीन तरुणांनी सदस्यता अभियानात उत्साहाने सक्रिय सहभाग नोंदवला,तरुणांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेल्या योजनांचा लाभ घेण्याची विनंती याप्रसंगी सदस्यता अभियानात तरुणांना केली.
या अभियानात भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने,गणेश साखरे,भाजयुमो शहर मध्य मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी,पश्चिम मंडल अध्यक्ष रोहन मराठे,सचिव ओंकार होमकर,बाबुराव क्षीरसागर,गणेश पवार,विकास धायफुले, व पदाधिकारी उपस्थित होते