Thursday, March 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उजनीचे पाणी सीना नदीत सोडण्यासाठी दिलीप माने झाले आक्रमक ; शेतकऱ्यांसह गाठले कार्यालय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) उजनी जलाशयातून सीना नदीवरील शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद असून त्याखालील पाकणी पासून कोर्सेगाव पर्यंत ९ बंधारे भरण्यासाठी पाणीवाटप धोरणा तरतूद करा व सध्या पिण्याचे पाण्यासाठी सिना नदीत पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे धीरज साळे यांना निवेदनाद्वारे केली.

दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांच्यावतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता यांना भेटून सिना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून सिना नदी काठच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी प्रकल्पाच्या पाणी वाटप नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. सध्या शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्याखालील पाकणी पासून कोर्सेगाव पर्यंत 9 बंधारे असून यावर पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे या भागात देखील पाणी सोडणे गरजेचे आहे. शासनाने समन्यायी वाटप धोरण स्विकारले असून यापुढे सिना नदीतून पाकणी बंधाऱ्यापासून कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करा अन्यथा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे कायदेशीर दाद मागू असे माने यांनी सांगितले.

पावसाचे चारही महिने संपले तरी जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. खरीप पिके हातची गेली. तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या सिना नदी कोरडी असल्याने नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाण्याची, जनावरांसाठी व पिकांसाठी सीना नदीत सद्यस्थितीत पाणी सोडणे आवश्यक आहे. तरी या भागातील परिस्थितीचा विचार करून सिना नदीत कारंबा शाखा कालवा कि.मी. 39 मधून पाकणी को.प. पासून कोर्सेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी माने यांनी केली. 

यावेळी कार्यकारी अभियंता संभाजी माने,  दिगंबर तात्या मेठे, प्रकाश अवताडे, विकास पाटील, शिवाजी पाटील, गोवर्धन जगताप, बालाजी येलगुंडे, काशिनाथ गौडगुंडे, सोमनाथ गायकवाड, लता जावीर,ज्ञानोबा साखरे,गणपत बचुटे, अशोक गुंड, उमाकांत बचुटे, कुमार बचुटे, अजय सोनटक्के, सुदर्शन पाटील, निखिल देशपांडे, जैनुद्दीन शेख, तानाजी सिनगारे, प्रभाकर गुंड, पृथ्वीराज माने, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, उमेश भगत, तात्या कदम, किरण बंडगर,महेंद्र खटके, अजय रेवजे, ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता पवार, तुकाराम भडकुंबे, पठाण सलगर, मुरलीधर शिंदे आदीसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दौऱ्यावर येण्यापूर्वी महत्वाचे आवाहन ;जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर हे टाळावे

Next Post

सोलापूर झेडपीचे 81 प्राथमिक शिक्षक झाले या पदासाठी पात्र ; उडाली झुंबड, कशाचे होते समुपदेशन वाचा हि बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीचे 81 प्राथमिक शिक्षक झाले या पदासाठी पात्र ; उडाली झुंबड, कशाचे होते समुपदेशन वाचा हि बातमी

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973181
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group