सोलापूर दि. ९/१०/२०२२ रोजी होटगी येथील श्री. प्रभू यल्लालिंग महाराज होटगी यांचे सध्याचे मठाधीश आरोपी यल्लालिंग गुरुनाथ व्हनमाने यांचे विरुद्ध वळसंग पोलीस स्टेशन येथे खोटे कागदपत्र बनवून मठाची मिळकत ही बेकायदेशीररित्या विक्री तसेच न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे यातील आरोपी हा सोलापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन कामी धाव घेतलेली होती.
सदर प्रकरणी मुळ फिर्यादी आनंद रेवणसिद्ध जाधव यांनी पूर्व जामीनच्या अर्जास हरकत घेऊन सदर प्रकरणी अटक मिळकतीच्या कागदपत्रांमध्ये बनावटीकरण केल्या प्रकरणी होटगी येथील तत्कालीन होटगीचे तलाठी यांना गुन्हया कामी आरोपी करणे तसेच मुळ कागदपत्र हस्तगत करणे गरजेचे असल्याची बाब मे. न्यायालयात मांडले, तसेच सदर आरोपी विरुद्ध बरेचसे गुन्हे प्रलंबित असून त्यात मिळकती बळकावणे, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जिवीतास धोका होईल असे कृत्य केल्याप्रकरणी बरेचसे गुन्हे दाखल असल्याची बाब मे. कोर्टासमक्ष मांडली, तसेच सरकारी अधिवक्ता यांनी देखील त्यांचे म्हणणे मांडून अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करणे कामी युक्तीवाद केला असता, सदर युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधिश श्रीमती कविता शिरभाते यांनी युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
सदर प्रकरणी आरोपीकडून अॅड. साका, तसेच सरकार पक्षाकडून अॅड. पवार व मुळ फिर्यादीतर्फे आम आदमी पाटीचे माहितगार वकिल ॲण्ड धानय्या कपाळे, अॅड, सागर पाटील, अॅड खबीत. ॲड. स्वामी, अॅड. दिपाली जोशी तसेच तपासिक अधिकारी पी.एस.आय. शेख यांनी काम पाहिले.


















