सोलापुरात ‘पुतण्यासाठी काका’ आले धावून ; दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ; मनसेचा सत्तार शिवसेनेत
सोलापूर : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काका पुतण्याचे राजकीय वैर पाहायला मिळत आहे. ठाकरे घराण्यातील काका पुतण्या मधील विषय या निवडणुकीत गाजताना पहायला मिळतोय. पण सोलापुरात पुतण्या साठी काका धावून आल्याचा सुखद प्रकार पाहायला मिळाला.
वर्षभरापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रविकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत स्टेजवर उपस्थिती लावून सर्वांना चकित केले.
त्यांचे पुतणे अमर पाटील हे शिवसेनेचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सद्याची राजकीय परिस्थिती पाहता रवि पाटील यांनी उचललेले पाऊल त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. राष्ट्रवादीचा नेता थेट उध्दव ठाकरे यांच्या स्टेजवर येतो, त्यांना थेट ठाकरे यांच्या शेजारी खुर्ची देत रतिकांत पाटील यांनी बंधूला सन्मान दिला. हा निश्चितच अजित दादांच्या राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक वर्ष काम केलेले युवा नेते सत्तार सय्यद यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांचा मुस्लिम नेता सेनेत आल्याने नक्कीच अमर पाटील यांना फायदा होईल असे बोलले जात आहे.