भाजप बंडखोर अमर बिराजदार यांचा शोभा बनशेट्टी यांना पाठिंबा ; काँग्रेसच्या प्रकाश वाले यांची माघार, भूमिका अस्पष्ट
सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात आता जवळजवळ तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे आणि भाजप बंडखोर शोभा बनशेट्टी या तिघांमध्ये ही लढत होत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे बंडखोर बिराजदार यांनी आपला अर्ज मागे घेत शोभा बनशेट्टी यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत अशोक निम्बर्गी, सुरेश पाटील, श्रीशैल बनशेट्टी हे उपस्थित होते.
बिराजदार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत बनशेट्टी यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसच्या प्रकाश वाले यांनी पक्षाचा निषेध नोंदवत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले ते नेमके काय म्हणाले पहा