दोन सुभाष देशमुखांचे अर्ज उडाले ; अपक्ष मेनका राठोड यांना धक्का, अर्ज नामंजूर
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आ. सुभाष देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या देशमुख सुभाष रंगनाथ, देशमुख सुभाष अण्णाराव या दोन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले होते. त्यामुळे भाजपचा देशमुख यांची डोकेदुखी वाढली होती.
बुधवारी उमेदवारी अर्ज छाननी दिवशी सुभाष रंगनाथ देशमुख व सुभाष अण्णाराव देशमुख या दोन पक्ष उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामंजूर केले त्यांच्या अर्जावर दहा सूचकांच्या सह्या नव्हत्या अशी माहिती मिळाली.
भारतीय जनता पार्टी मधून बंडखोरी केलेल्या माजी नगरसेविका मेनका राठोड यांचाही अर्ज नामंजूर झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद नव्हती त्यामुळे हा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे समजले. दरम्यान राठोड यांनी सुनावणीला आपला वकील बोलावला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला.
संगमेश्वर काडादी, आप्पासाहेब पाटील यांचेही अर्ज नामंजूर केल्याची माहिती मिळाली.