आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अर्जावर कोठे यांची हरकत ; विजय, विजयकुमार, सिद्राम, सिद्रामप्पा हे काय?
सोलापूर : शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांनी विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अर्जावर हरकत घेतली आहे. या हरकतीमध्ये विजयकुमार देशमुख यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये काहींवर विजय देशमुख काहींवर विजयकुमार देशमुख तसेच त्यांच्या वडिलांच्या नावाचे काही ठिकाणी सिद्राम तर काही ठिकाणी सिद्रामप्पा कसे अशी हरकत घेतली होती. यामध्ये वेगवेगळी नावे कशी त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करावे अशी मागणी कोठे यांच्या वकिलाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर केली. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज मंजूर केले आहेत.
विजयकुमार देशमुख यांच्या चिरंजीव किरण देशमुख यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी कडून पूरक उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु मुख्य उमेदवार विजयकुमार देशमुख यांचा अर्ज मंजूर झाल्याने किरण देशमुख यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.
यापूर्वी विजयकुमार देशमुख यांनीही महेश कोठे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचाही अर्ज मंजूर केला.