अरे मी त्यासाठी नाही आलो…., “सगळ्या मीडियाच्या नजरा फिरल्या तिकडे, अरे हे कसे इकडे”
सोलापूर : विधानसभा निवडणुकी साठी निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाकडे साडेबाराच्या सुमारास अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, प्रकाश वानकर तसेच त्यांच्या मातोश्री असे एकूण चौघेजण दक्षिण सोलापूर निवडणूक कार्यालयाकडे दाखल झाले.
गणेश वानकर येताच सर्व मीडियाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या, फोटो काढू लागले, तेवढ्यात गणेश वानकर यांनी फॉर्म भरण्यासाठी आलो नाही, खरेदी विक्री कार्यालयात काम आहे त्यासाठी आलोय असे म्हणताच उपस्थित यामध्ये हशा पिकला.