Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रमोद मोरे उचलणार ‘शहर मध्य’चे शिवधनुष्य ; अनेक दिग्गजांना मागे टाकणारे प्रमोद मोरे आहेत तरी कोण?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2024
in political
0
प्रमोद मोरे उचलणार ‘शहर मध्य’चे शिवधनुष्य ; अनेक दिग्गजांना मागे टाकणारे प्रमोद मोरे आहेत तरी कोण?
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रमोद मोरे उचलणार ‘शहर मध्य’चे शिवधनुष्य ; अनेक दिग्गजांना मागे टाकणारे प्रमोद मोरे आहेत तरी कोण?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरातील शहर मध्य हा मतदारसंघ महायुती मधून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला जाणार असल्याने अनेक जण इच्छुक आहेत पण मागील काही दिवसात एकच चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ज्याने अनेक इच्छुकांना मागे टाकले तो म्हणजे प्रमोद मोरे यांचा.

शहर मध्य या बहुभाषिक मतदारसंघात जो चेहरा सर्व समाजाची मते घेतो तो विजयी होतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मागील तीन टर्म कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला. आता त्या खासदार झाल्या आहेत, त्यामुळे अनेकांनी या मतदारसंघात आमदारकीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

महायुती मधून ही जागा निश्चित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाणार हे जवळजवळ फिक्स आहे. शिवसेनेकडून जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत परंतु मागील 15 ते 20 दिवसांपासून प्रमोद मोरे हे नाव इच्छुकांमध्ये आघाडीवर आहे. त्यांच्याच नावाची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळत आहे त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित झाल्याचे बोलले जात असून अनेक इच्छुक हे उमेदवारीसाठी मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचे माहिती आहे.

या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार कितपत चालणार हा सुद्धा पक्षासमोर प्रश्न आहे. त्याचबरोबर पक्षाचे राज्य सचिव माशीलकर यांनी या निवडणुकीत शिवसेना स्वच्छ प्रतिमा, गुन्हे दाखल नसलेला उमेदवार देणार अशी भाषा केल्याने इच्छुकांमध्ये आघाडीवर असलेल्यांची ‘मनीषा ‘ धुळीस मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत प्रमोद मोरे?

मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर, सध्या जुळे सोलापुरातील मिरा नगरात राहतात. शिक्षण बीई सिव्हील,  घरातच राजकीय वारसा असल्याने वडील स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्याकडून राजकारणाचे धडे, त्यामुळे विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा. स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्याने दत्त कंट्रक्शनच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार दिला आहे. स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांसाठी शिबिरे भरवताना विशेष करून युवक, महिला, शेतकरी, गोरगरीब जनतेसाठी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात मोरे प्रतिष्ठानने केलेले काम कौतुकास्पद होते. आपल्या कार्यातून महिला सक्षमीकरणातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Tags: #pramod more#शहर मध्य विधानसभाShivsenaVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण मध्ये काँग्रेस नेता बंडखोरीच्या तयारीत? ; राज ठाकरे यांच्या भेटीने खळबळ

Next Post

50 हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा तंत्र अधिकारी अटकेत ; गाडीत सापडले सहा लाख रुपये

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
50 हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा तंत्र अधिकारी अटकेत ; गाडीत सापडले सहा लाख रुपये

50 हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा तंत्र अधिकारी अटकेत ; गाडीत सापडले सहा लाख रुपये

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1992008
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group