उमेदवारी न मिळाल्यास सोलापुरात मुस्लिम समाज बंडखोरी करणार ; बाबा मिस्त्री यांना पाठिंबा राहील
सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून शहर मध्य च्या विधानसभा जागेवरून मुस्लिम समाजाकडून सातत्याने काँग्रेस पक्षाकडून अथवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मिळावी यासाठी सर्व नेत्यांकडून मागणी केली जात आहे. निवडणुका घोषित झाल्यापासून मुस्लिम समाजाकडून आता उमेदवार मिळावा ही मागणी जोर धरू लागली आहे.
असे असताना आज शहरातील मुस्लिम समाजातील नेते एकत्र येत पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेस माजी महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, तौफिक शेख, शौकत पठाण, नैरुद्दिन मुल्ला, कोमारो सय्यद, शकील मौलवी, शिवा बाटलीवाला, मैनोद्दिन शेख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले की, आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. परिणामी गरज पडल्यास आम्ही बंडखोरी करू असा थेट इशारा यावेळी देण्यात आला आहे. येत्या 20 ऑक्टोबर रोजी ताज कंपाऊंड येथे मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
उपस्थित पत्रकारांनी बाबा मिस्त्रींना शहर मध्य मधून उमेदवारी मिळाल्यास आपण कोणता निर्णय घेणार हे विचारल्यावर बाबा मिस्त्रींना जाहीर पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्यात येईल.
तर दुसरीकडे फारुख शाब्दी यांना समाजाकडून पाठिंबा देता का?या प्रश्नावर आम्ही MIM ला विरोध नसून त्यांच्या मुळे आम्हाला फायदा नसून आम्हाला काँग्रेस कडून अथवा महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार हवा असे सांगण्यात आले.