सोलापूर : बोरामणी विमानतळ सुरू करा, सिद्धेश्वर साखर कारखान्यांची चिमणी वाचवा या मागणीसाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली हजारों शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे पुढे होम मैदानावर भव्य सभेत रूपांतर झाले. या सभेला दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांसह पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, जोपर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याचे नेतृत्व काडादी कुटुंबियांकडे आहे तोपर्यंत आमचा कायम पाठिंबा राहील.
ते पुढे म्हणाले, देशात इतके उद्योगपती आहेत की, अर्धे विमानतळ ‘अदानी’ ग्रुपला देण्यात आले आहेत. सरकारला आमची विनंती आहे, बोरामणी विमानतळाचा खर्च करता येत नसेल तर हे विमानतळ अदानी ग्रुपला विकसित करायला द्या, ज्या भावनेने बोरामणीच्या शेतकऱ्यांनी विमानतळाला जमीन दिली त्यांचा विचार करणार का नाही. पहा नक्की काय म्हणाले, दिलीप माने हा व्हिडीओ…



















