सोलापूर : मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा बुधवार 28 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होणार आहे. अध्यक्ष श्रीकांत मोरे व निवड समिती अध्यक्ष डॉ राजशेखर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना पुरस्काराची घोषणा केली.
राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार डॉ सदानंद मोरे, समग्र साहित्य पुणे, मनोरमा साहित्य गौरव पुरस्कार अशोक समेळ, समग्र साहित्य ठाणे, मनोरमा साहित्य शासकीय पुरस्कार श्रीकांत देशमुख नांदेड, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉ मीनाक्षी पाटील (कविता) मुंबई, डॉ दादा कोरे औरंगाबाद, उर्मिला आगरकर (भाषा) सोलापूर, साहित्यसेवा पुरस्कार दत्ता गायकवाड (चरित्र) सोलापूर, प्रा.सीताराम सावंत (कथा) सांगोला, पत्रकार पुरस्कार प्रशांत जोशी, अश्विनी तडवळकर सोलापूर, साहित्य पुरस्कार प्रा. राजेंद्र शेंडगे (कविता) सोलापूर यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
शिवछत्रपती रंगभवन सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भूषविणार आहेत. माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळीचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, सारथी पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, मसाप पुणे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रारंभी या कार्यक्रमात सिने अभिनेता देवदत्त नागे यांची प्रकट मुलाखत पत्रकार अश्विनी धायगुडे या घेणार आहेत.
यावेळी शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, डॉ कविता मुरुमकर, प्रा.माधव कुलकर्णी, संतोष सुरवसे, कल्याण शिंदे,राजेंद्र भोसले, प्रा.दत्ता घोलप यांची उपस्थिती होती.




















