पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना काल शनिवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी घडली.
देवराज दिलीप पवार वय १९, रा. वडार गल्ली असे आरोपीचे नाव आहे. पवार याच्याविरुध्द दक्षिण पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दक्षिण ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या पथकाने आरोपीला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपबाहेर काढले.
त्यास प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी पोलीस कर्मचारी दासरे व अंगुले यांनी नेले. न्यायालयाने त्यास २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने त्यास पोलीस ठाण्यामध्ये चौकशी व जबाब घेण्यासाठी आणून बसविले. त्यावेळी तो अचानक उठल्याने पोलीस पथकाने त्याच्या हाताला पकडले. त्यावेळी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. या घटनेची तक्रार काकडे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली.
.jpg)

















