Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भालशंकर गौरव समितीच्या पुरस्काराचे थाटात वितरण ; निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे कौतुकास्पद – अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 December 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर ,दि. 25 – काही कारणामुळे अनेकांचे पालकत्व हरवले आहे. अशा काही विद्यार्थ्यांना मायेचा आधार देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नामदेवराव भालशंकर गौरव समितीने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.  


नामदेवराव भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन आणि सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने इंदिरा सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी बोलत ते होते. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी रुक्मिणी भालशंकर, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष शहा, माजी सरपंच पंडित खारे, बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे व रमेश लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, नानासाहेब भालशंकर आदी उपस्थित होते. 


प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले.  यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सुपुत्र माजी पोलीस उपायुक्त आणि महाराष्ट्र विद्यार्थी पालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब दैठणकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक दिलपाक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील  सहाय्यक प्राध्यापिका सीमा सरवदे,  विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कारासाठी बहुजन आवाज न्यूज चॅनेलचे उपसंपादक विजयकुमार लोंढे आणि लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नारायण घंटे,  माता रमाई आदर्श माता पुरस्कारासाठी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी नूतन कसबेकर ,  राजर्षी शाहू महाराज युवा उद्योजक पुरस्कारासाठी धानेश्वरी ट्रेडिंग अँड सेल्सचे चंद्रकांत नागणसुरे,  क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी विश्वभूषण विद्यालयातील प्रवीण पाटील आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी लालबहादूर शास्त्री प्रशालेतील वासंती पाटील यांचा समावेश आहे. 


त्यानंतर रुक्मणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, भावनिकतेपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाचे असून ती समाजोउपयोगी प्रत्यक्ष उपक्रमातून कृतीतून करणे  या सामाजिक बांधिलकीतून हा आदर्श उपक्रम आम्ही राबवित आहोत. प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मोठमोठ्या यशाचे सूत्रे ही वेगवेगळी असली तरी त्यात परिश्रम हाच गुण कायम असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत कौशल्य व मूल्येही आवश्यक आहेत असे विचार मांडले. सत्कारमूर्तींच्यावतीने माजी पोलीस आयुक्त आबासाहेब दैठणकर आणि सीमा सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव यांचीही भाषणे झाली. या समारंभाचे सूत्रसंचालन  विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले तर प्रा. युवराज भोसले यांनी आभार मानले.

हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल जानराव, प्रकाश साळवे, धनाजी धिमधिमे, मल्लिकार्जुन कांबळे, दाऊत आतार, अभिजीत भंडारे, संदीप निस्ताने, दत्तात्रय शिंदे, विष्णू लादे, कैलास माने, सत्यवान पाचकुडवे ,विनोद वर, सदानंद कोळी यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

पोलिसाच्या हाताला हिसका देऊन आरोपी पोलीस ठाण्यातून पळाला

Next Post

वाचला रे बाबा ! नाही तर ऊसाच्या ढिगाऱ्याखाली….. सोलापुरातील रात्रीची घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वाचला रे बाबा ! नाही तर ऊसाच्या ढिगाऱ्याखाली..... सोलापुरातील रात्रीची घटना

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972832
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group