‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. ही जागा आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले.
जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचा गावभेट दौरा झाला यावेळी डोणगाव येथे आयोजित बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख संजय पोळ, धर्मराज बगले, सदाशिव सलगर, वजीर शेख, नजीर शेख, परिनीती शिंदे, सिद्धाराम कोलते आदी उपस्थित होते.
यावेळी अमर पाटील म्हणाले, वडील रतिकांत पाटील आमदार असताना दक्षिण सोलापुरात वीज, रस्ते, पाणी व आरोग्यासह इतर क्षेत्रातही मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. मी, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर बाजार समिती सदस्य म्हणून विकासकामे करण्याबरोबरच सर्वसामान्य जनता, शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविले आहे. मात्र,गेल्या दहा वर्षांत तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने ‘दक्षिण’चा विकास झाला नाही.
आज मतदारसंघात वीज, रस्ते, पाणी, आरोग्य आणि भूमिगत गटारीचे प्रश्न सुटले नाहीत.आज जनतेला या समस्यांचा मोठा त्रास होत आहे. मतदारसंघात
एमआयडीसी नसल्याने बेरोजगार युवकांची पोटासाठी भटकंती सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींना एमआयडीसी उभारता आले नाही.सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. वाढती महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे.पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. हे सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचाच आमदार निवडून येणे गरजेचे आहे. जनतेनी एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावीत आपण निश्चितच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.