सोलापूर : घरासमोरील मुलीला जबरदस्तीने गाडीत बसून नेल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना मंगळवारी दुपारी मुलीच्या घरासमोर घडली आहे.
राहत्या घरासमोर थांबलेल्या 21 वर्षीय मुलीला मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एकूण चार जणांनी मिळून पांढऱ्या रंगाच्या कारमधून बसवून लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेले अशी तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून महानगरपालिकेच माजी नगरसेवकाचा मुलगा मैनोद्दीन हत्तुरे व तसेच त्याचे साथीदार तौसीफ बागवान, अमीर रामपुरे, सुफियान बागवान सर्व राहणार सोलापूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे हे करीत आहेत.


















