सोलापूर शहर काँग्रेस इंटक विभाग व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन तर्फे आजादी का अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धेचा बक्षीस वितरण व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदर प्रणिती शिंदे, सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी विश्वनाथ चाकोते, उद्योगपती दत्ता सुरवसे, संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले, व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. बक्षीस आणि पुरस्कराचा स्वरूप शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असा होता ऐकून अट्ठावन्न हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले
या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार सचिन खरात, धनंजय टाकळीकर, ऋत्विज चव्हाण यांनी केले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, राहुल गांधी आणि काँग्रेस नेते जेव्हा मोदी किंवा भाजपा विरोधात बोलतात तेव्हा मीडिया दाखवत नाही, ब्लैक आउट केले जाते. सोशल मिडियावर ट्रोल केले जाते म्हणून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करत आहेत. एकीकडे विरोधकांचे आवाज दाबले जात असताना विधानसभेत माइक बंद केले जात आहेत बोलू देत नाहीत. अश्या कठीण प्रसंगी विनोद भोसले यांनी पोस्टर स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांचा आवाज, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आहात. सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुसायचे, इतिहास बदलायचे चालू आहे पण या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहास पुन्हा एकदा जीवंत करण्याचे काम विनोद भोसले करत आहेत.
यावेळी विनोद भोसले यांनी माहिती दिली की, काँग्रेस भवन सोलापुर येथे हे पोस्टर प्रदर्शन दिनांक 28 व 29 डिसेंबर असे दोन दिवस सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 पर्यंत नागरिकांना मोफत पाहण्यासाठी खुला राहिल.
















