सोलापूर : बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात येऊन एका महिलेने बराच वेळ गोंधळ घातला. शिक्षण विभागाने मला फसवले असून मी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना मोठी रक्कम दिल्याचा आरोपी तिने केला आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी मात्र मी तुम्हाला ओळखत नाही, आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत असे होत नाही म्हणून तिच्यापासून सुटका करून घेतली. या घटनेनंतर हा काय नवीन प्रकार म्हणून शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारच्या गोंधळा नंतर निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार हे पुन्हा चर्चेत आले आहेत.
याच विषयाची गुरुवारी जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना नवीन डोकेदुखी झाली आहे. संबंधित महिला ही संजय जावीर यांना ‘जाबिर पाशा’ म्हणून संबोधते. याच नावाची मजेदार चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागली आहे.
दरम्यान संजय जावीर यांची प्रतिक्रिया घेतली असता मी त्या महिलेला ओळखत नाही, तिने इथे येऊन आरोप करण्यापेक्षा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करावा ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले त्यांची नावे घालावीत असे स्पष्टीकरण दिले पहा जावीर यांची प्रतिक्रिया काय


















