सोलापूर : तब्बल 60 लाख रुपयांची मागणी करत एका रिक्षा चालकाने पैसे नाही दिल्यास जिलेटीन कांड्या लावून हॉटेल लोट्स उडवून देईन अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक 15 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान घरात चिट्ठी टाकून पैशाची मागणी करत धमकवण्यात आले आहे.
प्रियदर्शन हर्षवर्धन शहा, वय- ५६ वर्षे, व्यवसाय- हॉटेल व बांधकाम, रा. सुखकर्ता ४९/ ए, रेल्वे लाईन सेंट जोसेफ शाळेजवळ, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
रिक्षा क्रं. एम एच १३ सी टी ५१८७ चा चालक नाव पत्ता माहित नाही याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घरामध्ये चिठ्ठी टाकुन २० लाख रु द्या नाहितर जिलेटीन कांडया लावून तुमचे लोटस हॉटेल उडवुन देतो व दि. २६/१२/२०२२ रोजी १६.१५ वा ते १६.३० वा चे दरम्यान फिर्यादीचे राहते घरात पुन्हा चिठ्ठी टाकुन ४० लाख रुपये द्या नाहितर तुमचे हॉटेल मध्ये राहत असलेल्या व्यक्तीसह जिलेटीन कांडया लावुन तुमचे लोटस हॉटेल उडवुन देतो अशी धमकी ( क्षती पोहचविण्याचे उद्देशाने) देवून फिर्यादीस एकुण ६० लाख रुपये मागणी केली आहे.

















