समाजकल्याणचे नागनाथ चौगुले पदोन्नतीने सांगलीला बदली ; जात पडताळणीचे सचिन कवले यांच्याकडे पदभार
सोलापूर : समाज कल्याण आयुक्तालयाने राज्यातील पाच समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांना पदोन्नतीने सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
सोलापूरच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन कवले यांनी आपल्या मूळ पदाचे कामकाज पाहून सांभाळावा अशा सूचना आयुक्तालयाने केल्या आहेत.
चौगुले हे फेब्रुवारी 2023 या महिन्यात उस्मानाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पदावरून सोलापूर सहाय्यक आयुक्त या पदावर आले होते. तसेच मागील काही वर्षापासून सचिन कवले हे सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.