Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मी पूर्णवेळ पत्रकार झालो असतो तर मंत्री झालो नसतो ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मिश्किल टिप्पणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : जबाबदारीचे काम करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षितता, स्थैर्य आणि स्वास्थ्य उपलब्ध व्हावे यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सर्व प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा परिषद २०२२’ मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना आठवले यांच्यासह माजी महापौर प्रशांत जगताप, सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या राही भिडे यांना मानाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच राजकारण, समाजसेवा, वैद्यकीय सेवा, उद्योजकता, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना आणि जनतेच्या हितासाठी आपल्या पद आणि अधिकाराचा प्रभावी उपयोग करणाऱ्या शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख परशुराम वाडेकर, पत्रकार कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद दीक्षित, महासचिव वेदांत गोयल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश वरळेकर, उपाध्यक्ष अमोल तोरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष आणि परिषदेचे संयोजक वसंत वाघमारे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. 

दैनिक राजदंड च्या नव्या स्वरूपातील अंकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पत्रकारांना विशेष संरक्षण देणारा कायदा राज्याने लागू केला आहे. केंद्र सरकारही त्याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, कायदा केला तरी त्याच्या काटेकोर अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात. त्यात लक्ष घालावे लागेल, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सध्याच्या काळात पत्रकारांनी केलेली विधायक टीकाही सहन करण्याची तयारी दाखवली जात नाही. शब्दांना शब्दाने स्पष्टीकरण अथवा प्रत्युत्तर देण्याऐवजी मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पत्रकारांना विशेष संरक्षणाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य लाभावे यासाठी पुणे, मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या कामात आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले. 

आगामी काळातही केंद्रात व राज्यात ‘आपले’च सरकार 

सध्या केंद्रात आपले सरकार आहे. राज्यातही शिंदे फडणवीस सरकार आहे. कोणी काही वल्गना केल्या तरी राज्यातील सरकार कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल आणि आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतरही भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्ता प्राप्त करेल, असा दावा आठवले यांनी केला. 

आई आणि पत्रकारांनी आपल्याला घडविले

चळवळीतील एक कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री या आपल्या प्रवासात आईप्रमाणेच पत्रकारांनी देखील आपल्याला घडविले आहे. आईने काबाडकष्ट करून मला शिक्षण दिले. संस्कार आणि संघर्षाची प्रेरणा दिली. चळवळीत काम करत असताना बहुतेक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी चळवळी आणि आंदोलनांच्या बातम्यांना व्यापक प्रसिद्धी दिली. त्यामुळेच एक संघर्षशील नेता म्हणून आपली देशभर प्रतिमा उभी राहिली, असे आठवले यांनी सांगितले. आपण चळवळीत कार्यरत असतानाच भूमिका नावाचे साप्ताहिक काढले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. मी पूर्णवेळ पत्रकार झालो असतो तर मंत्री झालो नसतो, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. 

अमोल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तर सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग: 20 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्कचा कर्मचारी रंगेहाथ ; अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

Next Post

किस्सा टेबल का ! ‘दूध पोळले आता ताक ही फुंकून’ ; समाज कल्याणच्या दलित वस्ती टेबलचा गुंता ‘कोहिनकर’ कसा सोडविणार | सोलापूर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

किस्सा टेबल का ! 'दूध पोळले आता ताक ही फुंकून' ; समाज कल्याणच्या दलित वस्ती टेबलचा गुंता 'कोहिनकर' कसा सोडविणार | सोलापूर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000963
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group